हाडवैद्य.शिवाजी लडकु पाटील

               
              हाडवैद्य.लडकु धर्मा पाटील
                   हाडवैद्य.शिवाजी लडकु पाटील

ठाणे जिल्ह्यामधील साखरोली, आनगाव पासून साखरोली हे गाव ३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात कै.लडकू धर्मा पाटील जन्म.०१/०१/१९२३ हे वयाच्या ९४ व्या वर्षापर्यंत मानवी शरीराची मोडलेली हाडे ५ मिनिटात बसवून व इतर वेगवेगळ्या आजारांवर औषोधोपचार करुण लाखो रुपये खर्च करणाऱ्या रुग्णांना जीवनदान देत होते.९४ वर्षांच्या कालावधीमध्ये लडकू धर्मा पाटील रा.साखरोली,ता.भिवंडी यांनी सुमारे लाखांहून अधिक लोकांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे.

 मानवी शरीराची कोणतीही चिरफाड न करता केवळ आपल्या हातांनी व आपल्या पायांच्या कलेनी रुग्णांचे मोडलेली व निसटलेली शरीराची हाडे एका झटक्यात बसवून रुग्णांना ठणठणीत करणे ही त्यांची प्रथा ,भिवंडी तालुक्यातील साखरोली गावात राहणारे कै.लडकू धर्मा पाटील हे महाराष्ट्रांतील जळगाव, नाशिक, धुळे, नवी मुंबई, मुंबई, वसई, विरार, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असून त्यांच्याकडे या परिसरातले लोक मोडलेली व निसटलेली हाडे बसवण्यासाठी येत असत. सर्वांना आश्चर्यचकीत करून टाकणारे हे समाजसेवेचे काम लडकू धर्मा पाटील यांनी सन १९५५ पासुन चालवत आणले आहे, आणि तेच देवदेण समाजसेवेचे काम आता त्यांचा मुलगा श्री.शिवाजी लडकु पाटील हे करत आहेत आणि लाखो लोकांना ठणठणीत करुण जीवदान देत आहेत.

शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या लडकू पाटील यांना या भागतले जूने वैद्य म्हणून संबोधले जाते. आपल्या शेती व्यवसायाबरोबर भट्टीचीही कामे कुटुंबासमवेत हाताळून आपल्या घराच्या अंगणातच रोज २५ ते ३० रुग्णांवर सामाजिक उपदेशातून कार्य करत होते. जंगलातील वनस्पती व नैसर्गिक साहित्याने ते रुग्णांवर उपचार करत. हात पाय व शरीराच्या कुठल्याही भागाचे हाड निसटले,मोडले किंवा चमक भरली, नसावर नस चढली यापैकी गेलेला रुग्ण त्यांच्या अंगणातून तात्काळ बरा होऊन येतो. अशा रुग्णांवर रुग्णालयामध्ये लाखो रुपयांचा खर्च करूनही त्यांची हाडे बसलेली नाहीत. त्यांना त्यांचे एक्स-रे पाहून तसेच काहींचे एक्स-रे नसताना त्यांच्या हाडांच्या वेदना लक्षात घेऊन हाताच्या व पायांच्या कलेने हाडे बसवने ही त्यांची कला आणि तेच कला कौशल्य आता त्याचा मुलगा जपत आहे व या कार्याचा वारसा चालवत आहे.  

 हाड बसवल्यानंतर २१ दिवसांसाठी त्या जागी प्लास्टरसारखी पट्टी बांधली जाते. ही पट्टी २१ दिवसानंतर रुग्णांनी आपल्या घरीच खोलायची असते. त्यासाठी हाडवैद्य यांची गरज भासत नाही. त्यांच्या चमत्कारी गुणांनी अनेक शहरी व ग्रामीण भागातील लोक अशा रुग्णांना त्यांच्याकडे घेऊन येतात. येथे येणाऱ्या रुग्णांला खर्च खुप कमी असल्याने रुग्णांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा कर्जाचा बोजा होत नाही. स्वखुशीने पाटील यांना दिलेल्या देणगीमधून गावात लडकू पाटील यांनी गणपतीचे मंदिर बांधले आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे समाजकार्य करत राहणार हे ते नेहमी म्हनायचे. रुग्ण कितीही गंभीर असो हाडवैद्य लडकू पाटील बाबा यांच्याकडे तो एकदा आला की, तो बरा होऊनच जातो. त्याचे समाधान रुग्णांच्या कुटुंबियांना वाटायचे. त्यांचा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना हेवा वाटत आहे. 

हाडवैद्य बनण्यापूर्वी त्यांनी आनगाव शाळेत इयत्ता ५ वीत शिकत असताना विज्ञानाच्या विषयासाठी शाळेत भिंतीला मानवी हाडांचा लावलेला सापळा रोज निरखून पाहिला. कोणती हाडे कुठे जोडली गेली आहेत याचा अभ्यासही ते घरी गेल्यावर करायचे. यातून त्यांनी ही कला जोपासली आहे आणि पूर्णतः त्यांचा मुलगा शिवाजी लडकु पाटील यांना सोपवली आहे. हाड जोडने या सोबत ते खुप आजारांवर ही उपचार करतात व औषध देतात.

औषधे-

कावीळ, संधिवात, मूतखडा,मधुमेह (डायबिटीज) , जखमेचे औषध, दातदुखी, उन्हाळे लागाने, वाय उतरने, केस गळती, त्वचा जळणे(भाजणे), मूळव्याध, रक्तस्त्राव, बाळाला दूध नसल्यास औषध(Agalactia), पीसीओडी , पॅरलाइझ,मणक्याचे गॅप ,सर्व हाडांचे फ्रैक्चर आणि इतर अनेक आयुर्वेदिक उपचार केले जातात...



                    


  वेळ

सकाळी- ८ ते १२

सायंकाळ - ३ ते ५

               

फोन नंबर- 9028622591
              - 9860631947

पत्ता- साखरोली पो.आनगांव ता.भिवंडी जि.ठाणे

ऐड्रेस लिंक-





Comments